किनगाव जट्टू येथील स्मशानभूमीचा होत आहे काया पालट
लोणार-आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- अनिल दराडे- लोणार तालुक्यातील किनगाव जट्टू येथील, देवीच्या मंदिरात जवळील, खापरखेड रस्त्यावर असलेल्या स्मशानभूमीची, फारच बिकट अवस्था झालेली आहे, त्यामुळे येथील स्वच्छता समितीचे अध्यक्ष राजेश नागरे, व सामाजिक कार्यात सतत अग्रेसर असणारे, ग्रामसेवक विनोद सातपुते, यांनी सदर स्मशानभूमीचे नंदनवर करण्याचा ध्यास घेतला आहे, यामुळे गजानन महाराजांच्या प्रकट दिनाच्या दिवशी, त्यांनी प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली असून, स्मशानभूमी मध्ये असलेली झाडे झुडपे, काटेरी झाडे, व इतर अनावश्यक बाबी काढून टाकून, स्वच्छता करण्यास ध्यास घेतला आहे. भविष्यात या स्मशानभूमीमध्ये, नागरिकांना असणाऱ्या आवश्यक सुविधा उपलब्ध करून, स्मशानभूमीचे नंदनवन करणार आहे, यामध्ये बसण्याची व्यवस्था, स्वच्छता, वेगवेगळ्या प्रकारची वृक्ष लागवड करून, मानवी जीवनाचा अंत, व त्यावर होणारे अंत्यसंस्कार आनंददायी वातावरणात व्हावे यासाठी प्रयत्न करणार आहेत, हे सर्व करण्यासाठी लोकसभागाचा वापर करून, नंदनवन करणार आहेत यासाठी राजेश नागरे, व विनोद सातपुते हे सातत्याने प्रयत्न करत आहेत,