‘विधवांनो’मुलांच्या भवितव्यासाठी विवाहाचा निर्णय घ्या- अश्विनी सोनोने
बुलढाणा -आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- विधवा महिलांना छोटी-मोठी मुले असतात विवाह केला तर या मुलांचे काय होईल ? हा विचार त्यांना सारखा सतावत असतो. त्यामुळे अनेक विधवा महिला लग्नासाठी पुढे येत नाही.मात्र विधवा महिलांनी लग्न केल्यास मुलांना पित्याचे छत्र मिळेल व जीवनात स्थैर्य देखील निर्माण होईल. यासाठी पुढे येण्याचे आवाहन सामाजिक कार्यकर्त्यां तथा मानस फाउंडेशन च्य सदस्या अस्विनी सोनोने यांनी केले आहे.
ऐतिहासिक विधवा विवाह सोहळा 18 मार्च रोजी मातृ मंडळ मंगल कार्यालय शिवशंकर नगर बुलडाणा या ठिकाणी पार पडत आहे.प्रा.डी एस लहाने यांच्या संकल्पनेतील हा सोहळा सर्वांचे आकर्षण व समाज बदलाची नांदी ठरतोय. या विवाह सोहळ्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. अनेक विधवा महिलांनी नोंदणी सुद्धा केली आहे. समाजमन तयार करणे हा विधवा विवाहातील मोठा अडथळा आहे. लोक काय म्हणतील या भीतीने अनेक महिला पुढे येण्यासाठी घाबरतात. तसेच विधवा महिलांना जर एखाद दुसर मुल असतील तर या मुलांचे काय होईल ?त्यांना व्यवस्थित सांभाळल जाईल का ?असा विचार त्यांना सारखा सतावत असतो. मात्र जगामध्ये सर्वच काही वाईट नसते. चांगल्या गोष्टीचे प्रमाणही बरेच आहे. त्यामुळे कोणतीही भीती न बाळगता या विधवा विवाह सोहळ्यामध्ये नावे नोंदवून आवर्जून उपस्थिती लावावी, शिवशाही पतसंस्था बुलढाणा या ठिकाणी प्यांच्या हेल्पलाइन उघडण्यात आली आहे.या ठिकाणी नोंदणी करावी असे आवाहन अश्विनी सोनवणे यांनी केले आहे .