Homeबुलढाणा (घाटावर)
दारूसाठी पैसे न दिल्याने साल्याने केली जावयास मारहाण
खामगाव – आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- दारूसाठी पैसे न दिल्याने जावयास मारहाण करण्यात आली. ही घटना सजनपुरी येथे सोमवारी रात्री घडली. तक्रारीनुसार, सजनपुरी येथील हनुमान मंदिराजवळील रहिवासी रवी मन्नालाल पिसाळे रात्री ८ वाजताच्या सुमारास घराबाहेर बसलेले होते. त्यावेळी त्यांचा साळा रामू लक्ष्मणर
सावरकर हा तेथे आला. दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली. त्यावेळी पिसाळे यांनी पैसे नसल्याचे सांगताच चिडून रामूने रवी यांना काठीने मारहाण करून शिवीगाळ केल्याचा आरोप तक्रारीत केला आहे.या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलिसांनी आरोपीविरोधात शिवीगाळ करणे तथा मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.