ग्रामसेवक संघटनेतर्फे एस डि ओ यांचा सत्कार
सिंदखेडराजा – आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- अनिल दराडे- सिंदखेड राजा येथे नुकतेच उपविभागीय अधिकारी म्हणून, प्रा. संजय खडसे रुजू झालेले आहेत, त्यामुळे सिंदखेड राजा ग्रामसेवक संघटनेतर्फे त्यांचा19 मार्चला पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला, यावेळी शासनाचे कामकाज वेळेत पूर्ण करण्यासाठी आपण प्रशासनाला सहकार्य करावे, असे त्यांनी सांगितले, तसेच ग्रामसेवकांना शासकीय कामकाज करताना अडचण आल्यास मी सदैव आपल्या पाठीशी आहे, असे सुद्धा सांगितले, सत्कार करतेवेळी जिल्हाध्यक्ष अशोक बुरकुल, कैलासझिने, गणेश मेहत्रे, विनोद सातपुते, अरविंद राठोड, कारभारी शिंगणे, रामदास मेहेत्रे, रवींद्र काळुसे, यांच्यासह अनेक ग्रामसेवक उपस्थित होते, अशी माहिती संघटनेचे प्रसिद्धीप्रमुख विनोद सातपुते यांनी दिली आहे