वाघाळा येथील युवकाची आत्महत्या
साखरखेर्डाः- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- येथील पोलिसा ठाण्यांतर्गत येत असलेल्या वाघाळा शिवारात एकाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २२ मार्च रोजी सकाळी उघडकीस आली.विशाल विजयसिंग इंगळे (२७) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. वाघाळा येथील पोलिस पाटील कडूबा बाळू राठोड यांनी यासंदर्भात साखरखेडा पोलिस ठाण्यास माहिती दिली वाघाळा शिवारात निवृत्ती वायाळ यांच्या शेतातील पळसाच्या झाडाला विशाल इंगळे याने आत्महत्या केल्याचे अनुषंगिक तक्रारीत म्हटले आहे.
बीट जमादार निवृत्ती पोफळे आणि पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मृत पावलेला युवक एका बँकेत एजंट म्हणून काम करीत होता, अशी माहिती आहे.नेमक्या कोणत्या कारणाने त्याने आत्महत्या केली ही बाब स्पष्ट होऊ शकली नाही. प्रकरणी साखरखेडा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे