वादातून माहेरी राहणाऱ्या पत्नीवर पतीनेच केला चाकूहल्ला
खामगावः-आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- पती-पत्नीत वाद झालेला असतानाही एका युवकाने पत्नीस बळजबरीने ऑटोत बसविले. त्यानंतर तिच्यावर चाकू हल्ला करून जखमी केले. ही घटना घटना गुरुवारी दुपारी जिया कॉलनी भागात घडली.तक्रारीनुसार, शिरीन परवीन शेख सादिक या विवाहितेचा तिच्या पतीसोबत वाद आहे. तिने खामगाव शहर पोलिसात तक्रार दिली असून, सध्या ती खामगाव येथे माहेरीच राहते.. गुरुवारी विवाहिता आणि तिची आई चौकशी कामी पोलिसात जाण्यासाठी घरून निघाल्या होत्या. यावेळी तिचा पती शेख सादिक शेख मुस्ताक (रा. जळगाव जामोद) हा ऑटो घेऊन आला. त्याने पत्नी शिरीन व तिच्या आईला बळजबरीने ऑटोत बसविले. त्यानंतर त्याने चाकू काढून शिरीन हिच्या गळ्यावर मारण्याचा प्रयत्न केला. शिरीन त्यात जखमी झाली.. दोघी मायलेकींनी आरडा-ओरड करत त्याच्या तावडीतून सुटका करुन घेतल्याचा आरोप तक्रारीत केला. या तक्रारीवरून पोलिसांनी पती शेख सादीक शेख मुश्ताक विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.