बुलढाणा लोकसभेसाठी महाविकास आघाडी कडून काँग्रेसच्या प्रदेश सचिव ऍड. जयश्री शेळके यांच्या नावाची जोरदार चर्चा…
उद्धव ठाकरे यांनी साताऱ्यातून चंद्रहार पाटील यांची उमेदवारी घोषित केल्याने बुलढाण्याची जागा काँग्रेसकडे येण्याची शक्यता.. तर लोकसभा लढवण्यास इच्छुक असलेल्या ऍड. जयश्री शेळके प्रबळ दावेदार...
बुलढाणा- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- उद्धव ठाकरे यांनी सांगली मधून चंद्रहार पाटील यांची सभेतून उमेदवारी जाहीर केली, मात्र एक दिवसापूर्वीच उद्धव ठाकरे यांनी बुलढाण्यात आल्यानंतर उमेदवाराच्या नावाचा उल्लेख करणेही टाळले त्यामुळे सक्षम उमेदवार नसल्यामुळे उद्धव ठाकरे अजूनही उमेदवाराची चाचपणी करत असल्याच बोलल जात आहे.. तर दुसरीकडे सांगली च्या जागेवरून काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटात असलेला तिढा आता सुटल्याच पाहायला मिळत आहे, उद्धव ठाकरे यांनी सांगलीच्या उमेदवाराची घोषणा केल्याने बुलढाण्याची जागा ही काँग्रेसकडे येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे, आणि त्यासाठी राष्ट्रीय काँग्रेसच्या प्रदेश सचिव ऍड. जयश्री शेळके ह्या प्रबळ दावेदार मानल्या जात आहेत.. जयश्री शेळके यांचे सहकार क्षेत्रात असलेले योगदान, बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण, संघटन कौशल्य पाहता सर्वच बाबतीत त्या सक्षम उमेदवार असल्याचं बोललं जात आहे, तर पक्षाने आदेश दिल्यास आपण लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याची प्रतिक्रिया जयश्री शेळके यांनी दिली आहे…