विवाहितेचा शारीरीक व मानसिक छळ सासरच्या ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
मेरा बु.- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- विवाहितेचे एक वर्षापूर्वी लग्न झाले आणि ९ महिन्याची गरोदर असतांना सासरच्या मंडळींनी पैशासाठी शाररिक व मानसिक छळ करुन मारहाण केली.अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या शेळगाव आटोळ येथील सुभाष रामराव मोरे यांच्या मुलीचे लग्न आत्माराम सिताराम गायकवाड रा. हिवरा काबली ता. जाफराबाद जि. जालना यांचा मुलगा अमोल याच्या सोबत समाजांच्या रितीरिवाजानुसार १७ मार्च २०२३ रोजी झाले होते. सदर महिला ही ९ महिन्याची गरोदर आहे. पती व सासू-सासरे तिच्या चारित्र्यावर संशय घेवून तुझ्या माहेरवरुन ५० हजार रुपये घेवून ये असे म्हणत होते. परंतु तिच्या आई वडिलांची परिस्थिती हलाखीची असल्याने पैसे देवू शकत
नव्हती. त्यामुळे तीचे पती सासू सासऱ्याचे तिला वागविण्यास नकार देत शिवीगाळ करून लाथा बुक्क्यांनी मारहाण करत पैसे आणले नाही. तर तुला मारुन टाकू अशी धमकी देत माहेरी हाकलून दिले. मुलीच्या आई वडिलांनी पंच मंडळी व नातेवाईक बोलावून समजावून सागितले. परंतु तीच्या पती व सासू सासरे यांनी वागविण्यास स्पष्ट नकार दिला त्यामुळे सौ. आरती अमोल
गायकवाड वय २४ वर्ष हिचे तक्रारी वरुन अंढेरा ठाणेदार विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डायरी अंमलदार वाघ यांनी ३० मार्च रोजी आरोपी पती अमोल आत्माराम गायकवाड, सासरे आत्माराम सिताराम गायकवाड, सासू कविता आत्माराम गायकवाड, ननंद ज्योती आत्माराम गायकवाड, सिताराम गायकवाड सर्व राहणार हिवरा काबली ता. जाफराबाद जि. जालना, मनीषा रवी मोरे, रवी मोरे रा. शिरपूर चिखली जि. बुलढाणा या ७ आरोपी विरुध्द अप न.- ०९०/२०२४ कलम ४९८ (अ) ३२३, ५०४, ५०६, ३४ भादवी नुसार गुन्हा दाखल करुन तपास बिट जमादार सोनकांबळे यांच्याकडे सोपविला आहे.