हार्डवेअरमधील गल्ल्यातून चोरट्याने रक्कम केली लंपास
शेगाव-आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- आठवडी बाजारातील न्यू सागर हार्डवेअर दुकानातील गल्ल्यातून रक्कम लंपास केल्याची घटना २८ मार्च रोजी घडली.याबाबत सागर गजानन हुसे वय ३३ रा. संविधान चौक यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली की, हार्डवेअर मधील सीसीटीव्ही नेहमी प्रमाणे चेक केले असता अज्ञात इसम अंगात काळ्या रंगाचे टी शर्ट व अंगावर महाकाल नाव असलेला रूमाल व १२ वर्षाचा मुलगा हा सीसीटीव्ही फुटेजमध्ये माझे दुकानाच्या गल्ल्यातील पैसे चोरतांना दिसून आला. त्यांनतर फिने गल्ल्यात ठेवलेले पैसे चेक केले असता फिला अंदाजे ३००० रू हे दिसुन आहे.
आले नाही. तसेच प्रविण सुरेश घाटोळ रा. सावता चौक शेगाव यांचे सुध्दा अब्दुल हमीद चौक शेगाव येथे गौरी हार्ड वेअर नावाचे दुकान असुन त्या दुकानात सुध्दा १६ मार्च रोजी ३.३० वाजता वरील अनोळखी इसमाने दुकानातील गल्ल्यातील अंदाजे ५००० रू चोरून नेले आहे. तरी वरील अनोळखी इसमाने फिचे न्यु सागर हार्डवेअर दुकानातुन अंदाजे ३००० रू तसेच गौरी हार्डवेअर नावाचे दुकान व गौरी हार्डवेअर नावाचे दुकानातील गल्ल्यातील अंदाजे ५००० रू चोरून नेले आहे. असे एकूण ८००० रू चोरून नेले आहे अशा तोंडी रिपोर्ट वरून कलम कलम ३८० भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला