मूल होत नाही’ म्हणून विवाहितेचा केला सासरच्या मंडळाने 3 वर्षे छळ
खामगाव :- आपलं बुलडाणा जिल्हा बातमी:- मूलबाळ होत नसल्याच्या कारणावरून एका २४ वर्षीय विवाहितेचा छळ करण्यात आला. याप्रकरणी विवाहितेच्या तक्रारीवरून पिंपळगाव राजा पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
तक्रारीनुसार, सीमा मंगेश तायडे २४ या विवाहितेचे लग्न मंगेश देवराज तायडे रा. सुदामा नगर, शेगाव याच्यासोबत झाले. लग्नानंतर ती नांदायला सासरी गेली. सुरुवातीचे काही काळ चांगले वागविले. मात्र, मूलबाळ होत नसल्याने सासरच्या मंडळींनी विवाहितेचा छळ सुरू केला. ८ जुलै २०२० ते १ जून २०२३ दरम्यान, पती आणि सासरच्या मंडळींकडून छळ आणि मारहाण झाली. या तक्रारीवरून पोलिसांनी पती मंगेश देवराज तायडे, सासरा देवराज किसन तायडे, सासू नंदा देवराज तायडे तिघे रा. सुदामानगर शेगाव, नणंद दुर्गा रतन दंदी रा. रिधोरा, जि. अकोला यांच्या विरोधात भादंवि कलम ४९८ (अ), ३२३, ५०४, ३४ नुसार गुन्हा दाखल केला.