35 वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या
मोताळा :- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- एका ३५ वर्षीय युवकाने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविल्याचीघटना १ एप्रिल रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास येथील प्रभाग क्र. १० मध्ये उघडकीस आली. याप्रकरणी तक्रारीवरून बोराखेडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. तालुक्यातील चिंचपूर येथील रहिवासी व सध्या मोताळा येथे वास्तव्यास असलेला मंगेश बारसू गाडेकर (३५) या युवकाने १ एप्रिल रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास येथील प्रभाग क्र. १० मध्ये स्वयंपाक घरात वायरच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी शे. सुलतान शे. नजीर यांनी बोराखेडी पोलिसात तक्रार दिली. त्यावरून प्रारंभिक तपासानंतर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल सुपडासिंग चव्हाण हे करीत आहेत.