Homeजिल्‍ह्याचे राजकारणबुलढाणा (घाटाखाली)बुलढाणा (घाटावर)

संदीप शेळकेंच्या विजयासाठी नातेवाईक, हितचिंतक, व राजश्री शाहू परिवार एकवटला

बुलडाण्यात पार पडला "विजय संकल्प" मेळावा..

Spread the love

L

बुलडाणा(आपलं बुलढाणा जिल्हा बातमी) :-वन बुलडाणा मिशनचे संकल्पक संदीप शेळके सुरूवातीपासूनच लोकसभेच्या मैदानात उतरले आहेत. या अनुषंगाने परिवर्तन रथयात्रेच्या माध्यमातून त्यांनी जिल्हा पिंजून काढला. त्यावेळी भरभक्कम प्रतिसाद त्यांना मिळाला. लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे १९ दिवस उरले आहेत. आता त्यांच्या प्रचारासाठी समर्थक तसेच हितचिंतक कामाला लागले आहेत. दरम्यान आज शेळके परिवाराचे नातेवाईक, हितचिंतक, आणि राजश्री शाहू परिवाराचे सदस्य यांचा एकत्रित मेळावा संपन्न झाला. यावेळी गावोगावी, घरोघरी जाऊन मतदारांशी संपर्क साधून संदीप शेळकेंना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार उपस्थितांनी केला.

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध आहोत, जिल्ह्याचा विकास हेच आपले वन मिशन आहे. विकासाचे व्हिजन मांडून आपली वाटचाल सुरू आहे. यंदाची ही निवडणूक परिवर्तन घडवून आणणारी आहे. जनता जनार्दन नक्कीच आपल्याला विजयी करेल असा विश्वास शेळके यांनी व्यक्त केला. तसेच यावेळी सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी गजानन सुसर, वैशाली सुसर, प्रा. अनिल ढगे, भाऊसाहेब शेळके, लता चिंचोले, नारायण गव्हणे, शारदाताई वायाळ यांचीही भाषणे झाली. संदीप शेळके यांना निवडून आणण्याचा संकल्प सगळ्यांनी मांडला. गावोगावी, घरोघरी जाऊन शेळके यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करू असा निर्धार करण्यात आला. संदीप शेळके यांचे समर्थक, हितचिंतक, नातेवाईक तसेच राजश्री शाहू परिवारा असंख्य सदस्य उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page