डिजेच्या आवाजाने मधमाशानी केली वराडीमंडळीवर हल्ला
१० जणांवर जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार सुरू..
आपलं बुलडाणा जिल्हा बातमी- बुलडाणा :- डिजे वाजविणे चांगलेच अगलट आले आहे. बुलढाणा शहरात अशी धक्कादायक घटना दि २८ एप्रिल रोजी सांयकाळी घडली आहे. जाभरूण रोडवरील मुट्टे यांच्या घराजवळ एक लग्न होते. त्या लग्नामध्ये डिजे वाजत होता. एक झाडावर असलेल्या आग्यामवळाच्या माश्याला त्यांचा प्रचंड त्रास झाला आणि त्यांनी त्यांच्या हल्लाबोल केला आहे. सविस्तर वृत असे की, डिजेचा आवाज खुप मोठ्या प्रमाणात असल्याने त्यांचा आग्यामवळाच्या माशाला त्रास झाला आणि त्या चिंगळ्या डिजेच्या थरावर नाचत असलेल्या वराडीमंडळावर त्यांनी हल्ला केला आहे. या हल्यामुळे सर्व पळापळ झाली आहे. यामध्ये १० जण जखमी झाले आहे. त्यांना जिल्हा सामान्य रूग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या सध्या उपचार सुरू आहे. यामध्ये अवंती वावळे, रमाबाई जाधव, मायाबाई झिने, सौरभ हिवाळे, सागर जाधव, बबन जाधव, पंकज गवई, राजू गवई, राजू वाहुळे, सुभाष गवई माया जाधव यांच्यावर जिल्हा सामन्य रूग्णालयात उपचार सुरू आहे.