जुन्या वादातून दोन व्यक्तींनी एका व्यक्तीला केली लोखंडी रॉडने मारहाण
आपलं बुलढाणा जिल्हा बातमी-जळगाव जा. :- तालुक्यातील सुनगाव येथे जुन्या वादातून दोन व्यक्तींनी एका व्यक्तीला लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घटना २८ एप्रिल रोजी सकाळी १०.३० वाजेदरम्यान घडली.फिर्यादी सुवर्णसिंग विठ्ठल सिंग राजपूत राहणार सुनगाव हे गावातीलच अनिल राजपूत यांच्या पान टपरी जवळ उभे असताना आरोपी किशोर येऊल, विजय येऊल या दोघांनी फिर्यादी सुवर्ण सिंग राजपूत यांना जुन्या भांडणाच्या कारणावरुन शिविगाळ करुन त्यांच्या हातात असलेल्या स्टिलच्या रॉडने दोघांनी फिर्यादी यांना जिवे मारण्याचे उददेशाने फिर्यादी यांचे दोन्ही पायावर, हातावर, डोक्याच्या मागचे बाजुला, कपाळावर मारुन गंभीर जखमी केले तसेच डाव्या हातावर बोटावर मारून जखमी केले व फिर्यादी यांना आरोपीनी मारत असतांना याला जिवाने मारुन टाकु असे बोलत होते. नंतर तेथे गावातील ज्वालासिंग कल्याणसिंग राजपुत व अनिल उदयसिंग राजपुत हे हजर आले व त्यांनी भांडण सोडविले. त्यानंतर गावातील प्रेमसिंग राजपुत यांनी फिर्यादी यांना त्यांचे गाडीत ग्रामिण रुग्णालय, जळगाव जामोद येथे उपचार कामी आणले व ग्रामीण रुग्णालयातच फिर्यादीची जबानी घेण्यात आली व त्यांच्या तक्रारीवरून आरोपीवर कलम ३०७, ३२६,५०४,५०६, ३४ भादंवि गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फिर्यादीला पुढील उपचारासाठी खामगाव येथे रेफर करण्यात आले आहे. पोनि महाजन यांच्या आदेशाने सपोनि पी. आर. इंगळे पुढील तपास करीत आहे.