अल्पवयीन मुलीस पळविल्या प्रकरणी सुनगाव येथील तरूणावर गुन्हा दाखल
आपला बुलढाणा जिल्हा बातमी-जळगाव जा. तालुक्यातील एका गावातील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला गावातीलच २४ वर्षीय तरुणाने फुस लावून पळवून नेल्याची घटना २५ एप्रिल रोजी रात्री ८ च्या सुमारास घडली. मुलगी घरच्यांना शौचास जाते म्हणून घराच्या बाहेर पडली व ती रात्री उशिरापर्यंत घरी आली नाही. म्हणून आई-वडिलांनी तिला शेजाऱ्यांच्या घरी व नातेवाईकांकडे शोधले परंतु ती मिळून आले नाही. नातेवाईकांसह मुलीचे पिता यांना सुनगावातील अमोल गजानन वसतकार हा पण घरी नसल्याचे यावेळी पळवून नेलेल्या मुलीच्या पित्याने सुनगाव येथील अमोल गजानन वसतकार याच्या विरोधात जळगाव जामोद पोलीस स्टेशनला जाऊन मुलीला फूस लावून पळविल्याची तक्रार दिली सदरच्या तक्रारीवरून पोलिसांनी अमोल वसतकार याच्या विरोधात अप नंबर २५२/२०२४ कलम ३६३ नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास ठाणेदार आनंद महाजन यांच्या मार्गदर्शनात स. पो. नि. पांडुरंग इंगळे करीत आहेत.