Homeबुलढाणा (घाटावर)
विवाहितेचा केला विनयभंग एकाविरोधात गुन्हा दाखल…
आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- डोणगाव : पोलिस ठाण्यांतर्गत येत असलेल्या एका गावातील महिला शेतात काम करीत असताना तिला ‘शेडमध्ये चल’ असे म्हणत विनयभंग केल्याच्या फिर्यादीवरून राजू विठोबा पवार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, पीडित महिला ही शेतात काम करीत असताना आरोपीने महिलेला तिचा मोबाइल नंबर मागितला. तो तिने दिला नाही. तेव्हा आरोपीने जबरीने पीडितेचा हात पकडून तिला शेडमध्ये चलण्यास सांगितले. तेव्हा पीडितेने त्याच्या हाताला झटका देत तेथून पलायन केले. याप्रकरणी पतीसह पोलिस ठाणे गाठत आरोपी राजू पवार याच्याविरोधात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी आरोपीविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.