दुचाकी व एसटी बस मध्ये अपघात १ युवक ठार तर १ जखमी मूर्ती फाट्या जवळील घटना….
बुलडाणा (आपलं बुलढाणा जिल्हा बातमी)- कोथळी येथून दोघे मित्र दुचाकीवर आपल्या मित्राच्या लग्नासाठी निघालेले होते लग्नाला जात असताना त्यांची एसटी बसला धडक होऊन त्यामध्ये एका मित्राचा मृत्यू तर दुसरा मित्र गंभीर जखमी झाला आहे सविस्तर वृत्त अशे की दुचाकी व एसटी बसची धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीस्वार वैभव गणगे ठार तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला. मोताळा तालुक्यातील मूर्ती फाटा येथे गुरुवारी दुपारी ३ वाजेच्या दरम्यान ही दुर्घटना घडली. मोताळा तालुक्यातील कोथळी येथील वैभव गणगे हा लग्नासाठी मित्रासोबत (एम.एच १९ बि. ए.१२८७ क्रमांकाच्या) दुचाकीने जात होता. एसटी बस मध्ये
(एम. एच ४० ए.एन ९९४१) धडक होऊन त्यामध्ये दुचाकीस्वार वैभव गणगे याचा जागीच मृत्यू झाला. तर त्याचा मित्र राजू बावणे हा गंभीर जखमी झाला. आहे. परिवहन महामंडळाची बस मेहकर येथून भुसावळला जात होती. बोराखेडी पोलिसांनी दोघांना बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले. मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येणार असून त्यानंतर पुढील कार्यवाही बोराखेडी पोलीस स्टेशनची कर्मचारी करीत आहेत.