मासरूळ येथे अक्षयतृतीयेनिमित्त जगदंबा माता उत्सवाचे आयोजन
रात्रभर विविध कार्यक्रमाचे आयोजन
आपलं बुलढाणा जिल्हा बातमी-मासरूळ- किरण देशमुख- मासरूळ येथे सालाबाद प्रमाणे याही वर्षी जगदंबा मातेचा उत्सव साजरा करण्यात येत असून या उत्सवाला खूप अनन्यसाधारण महत्त्व असून या उत्सवाला गावातील बाहेरगावी गेलेली बरीच मंडळी या अक्षय तृतीयेला आपल्या गावी परत येतात त्यामुळे या उत्सवाला यात्रेचे स्वरूप प्राप्त होते.
अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूतांपैकी एक असुन शास्त्रात या तिथीला स्वयंसिद्ध मुहूर्त आणि उगादी तिथी असे म्हटले आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य करण्यासाठी पंचांग पाहण्याची गरज नाही, या दिवशी केलेले कोणतेही शुभ कार्य अत्यंत शुभ आणि फलदायी मानले जाते.अक्षय्य तृतीयेमागे हिंदूंची आणखी एक रोचक श्रद्धा आहे.श्रीकृष्णाने पृथ्वीवर जन्म घेतला तेव्हा अक्षय्य तृतीयेच्या दिवशी त्यांचा गरीब मित्र सुदामा कृष्णाला भेटायला आला. कृष्णाला देण्यासाठी सुदामाकडे फक्त चार तांदळाचे दाणे होते, तेच सुदामाने कृष्णाच्या चरणी अर्पण केले. पण आपला मित्र आणि सर्वांचे हृदय जाणणाऱ्या देवाने सर्व काही समजून घेऊन सुदामाचे दारिद्र्य दूर केले, त्याच्या झोपडीचे महालात रूपांतर केले आणि त्याला सर्व सुविधांनी परिपूर्ण केले. तेव्हापासून अक्षय्य तृतीयेला केलेल्या दानाचे महत्त्व वाढले आहे. आणि म्हणूनच या शुभ दिनी कुणीही काहीही शुभकार्य करायचे असल्यास अक्षय तृतीया या तिथीला प्रारंभ करतात.
विविध पात्रांचे सादरीकरण अनेक वर्षापासून आई जगदंबा मातेच्या स्वारीचा मान येथील कोठाळे परिवाराकडे असून अगोदर गावातून त्यांची मिरवणूक काढून महीला वर्ग आपल्या अंगणात सडा-रांगोळी करून पूजा करतात या मिरवणुकीत गावकरी मंडळी सुद्धा मोठ्या संख्येने सहभागी होतात.यासोबतच श्री हनुमान,राम-लक्ष्मण,झाड-झुडी,तंट्याभील अशा विविध प्रकारच्या पात्राचे सादरीकरण करतात हा सर्व ऊत्सव रात्रभर चालत असतो आणि सकाळी पाच वाजेच्या दरम्यान आई जगदंबा मातेची भव्य स्वारी निघते.
मासरूळ येथे अक्षयतृतीयेच्या सणाला एक अनन्यसाधारण महत्व असून १० मे रोजी रात्रभर जागरण करून नवमी भरवल्या जाते व अत्यंत उत्साहामध्ये गावातील बाहेर गेलेले सर्व नागरिक यानिमित्ताने गावी येतात. समते वेगवेगळ्या पत्राची सोंग घेऊन नागरिक आपला आनंद साजरा करतात.दरवर्षी सर्वांच्या सहकार्यातून हा कार्यक्रम शांततेमध्ये पार पडत असतो.
मधुकर महाले
सरपंचपुत्र