पाणीपुरवठा अधिकारी व ठेकेदार यांचे संगणमात नागरिक त्रस्त
खराब पाण्याने करतेय ग्रामपंचायत नागरिकांचे समाधान नागरिकांचे आरोग्य धोक्यात
सिंदखेडराजा-आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- तालुक्यातील सावखेड तेजन हे गाव भलही विकासापासुन कोसो दुर आहे विकास भरगच्च नसेल तरी साचलेली गटारे, वर्षानु वर्षा पासून न झालेले रस्ते, गाव भर बोंबलत फिरणारी तरुण पिढी आणि गावाला पिडा लागून राहिलेला विषय म्हणजे पाणी, आता आमचं गाव मराठवाड्या सारखं टँकरवाडा झालं. इथे ग्रामपंचायत ने बांधलेल्या २ पाण्याच्या टाक्या त्यात एक गळकी असल्याची माहिती. आणि तिसरी चे बांधकाम सुरू असून ते 2-3 वर्षात पूर्ण होण्याची शक्यता. अशा अनेक समस्यांना तोंड देत इथले नागरिक जगतात. ते सुद्धा आता मुक्के झालेत. त्यांना वाली उरला नाहीच.
आमचा पाण्याचा प्रश्न मार्गी कोण लावणार आम्हाला जगण्याचा अधिकार आहेत की नाही. आसे सुज्ञ नागरिक प्रश्न उपस्थित करत आहेत रस्ते, लाईन, पाणी या शिवाय गावकरी मागतात तरी काय? गावकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी गावकऱ्यांनी बोलायचे कोणाला, ग्रामपंचायत सदस्याना हे प्रश्न सांगितले तर ते नागरिकांना तुम्ही काय करायचे करा या उमरट भाषेत बोलतांना दिसतात. मग अशा वेळी ग्रामपंचायती मधील सर्व जणांनी राजीनामे का देऊ नाहीत. का तुम्ही तुमच्या नावाला लेबल लावून ठेवले आहे. की ग्रामपंचायत तुम्हालाच खायची आहे हा प्रश्न उपस्थित होतो आहे. नागरिकांची गैरसोय होणे केव्हा बंद होईल हा सर्व सामान्य नागरिकांनी ग्रामपंचायत ला विचारलेला प्रश्न आहे.
अडीज कोटीच्या जल जीवन मिशन चा ठेकेदार सरपंचाचे ऐकत नसल्याचे प्रतिपादन
सावखेड तेजन गावा साठी 2 कोटी 64 लाख 30 हजार 828 रुपयांची जल जीवन मिशन अंतर्गत काम सुर आहे. या कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्ट्राचार झाल्याचं दिसत. ग्रामसेवक व सरपंचाचे कॉल ठेकेदार घेत नसल्याचं त्यांनी सांगितलं. असे असेल तर ठेकेदार काम करतो कसे या वर ग्रामपंचायत आवाज का उठवत नाही. की ते सुध्दा गूळ खावून गप्प बसलेत. गावामध्ये काही ठिकाणी नवीन पाईप टाकले तर गावातील काही भागांमध्ये जुन्याच पाईप लाईन वरून काम धकून काम मार्गी लावल्याचे दिसून आले.
दीड वर्ष उलटली तरी गावातील नवीन पाईप टाकणे झाले नाही
एक वर्षा अगोदर दैनिक लोकनेता ने पाण्यासंबंधात वृत्त प्रकाशित केले होते, तेव्हा ग्रामपंचायत ने एक महिन्यामध्ये नवीन पाईप टाकून देऊ असे आश्वासन दिले होते, परंतु आज पर्यंत ग्रामपंचायत ने कोणते आश्वासन पूर्ण केले नाही. असे असेल तर मग आमची ग्रामपंचायत काय करते हा प्रश्न नागरिकांना पडलेला आहे.