लोणार तहसीलदार अजय पिंपरकर यांचे अवैध रेती वाहनावर धडाकेबाज कारवाई
अवैध रेती वाहतूक वाहनाला 2 लाख 66 हजार ठोठावला दंड
आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- लोणार-(राहुल सरदार)- मराठवाड्यातून विदर्भात येणाऱ्या रात्रीच्या वेळी अवैध रेती वाहतूक करणाऱ्या वाहनाला लोणार तहसीलचे प्रभारी तहसीलदार अजय पिंपरकर यांच्या पथकाने पकडून दोन्ही वाहनाला 2 लाख 66 हजार रुपयांचा दंड ठोठावला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की मराठवाड्यातून रात्रीच्या वेळी अवैध रेती वाहतूक होत असल्याची माहिती लोणार मंडळ अधिकारी लक्ष्मणराव सानप यांना मिळाली त्यांनी तात्काळ ही बाब पथकप्रमुख तथा लोणार तहसीलचे प्रभारी तहसीलदार अजय पिंपरकर यांना सांगितली कुठलीही वेळ न गमावता प्रभारी तहसीलदार अजय पिंपरकर यांनी आपल्या पथकासह शेगाव पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील गणपती मंदिरासमोर अवैध रेती वाहतूक करणारे वाहन क्र. एम.एच.३७टी ३४२८ व एम.एच.21 बीएच४०५१ अवैध रेती वाहतूक करतांना आढळले. त्या वाहनांना ताब्यात घेत त्यांना अनुक्रमे १ ब्रास ,व २ ब्रास असा एकूण २ लाख ६६ हजार रु.दंड ठोठावला या कारवाईत लोणार तहसीलचे प्रभारी तहसीलदार अजय पिंपरकर,मेहकर तहसीलदार भूषण पाटील,लोणार मंडळ अधिकारी लक्ष्मणराव सानप,मेहकर मंडळ अधिकारी पंजाबराव मेटांगळे,महसूल अधिकारी पुरुषोत्तम आघाव यांनी सहभाग घेतला असून या अवैद्य रेती वाहनावर झालेल्या कारवाईमुळे अवैध रेती वाहतूक करणाऱ्या रेती माफियांचे धाबे दणाणले असून या पुढे अवैद्य रेती वाहतूक करणाऱ्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा लोणार तहसीलचे प्रभारी तहसीलदार अजय पिंपरकर व मंडळ अधिकारी लक्ष्मणराव सानप यांनी दिला आहे.