Homeक्राईम डायरीबुलढाणा (घाटाखाली)
मुलाला शोधण्याकरीता रस्त्याने जात असलेल्या महिलेचा पाठलाग करुन केला विनयभंग…
आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- खामगाव : मुलाला शोधण्याकरीता रस्त्याने जात असलेल्या महिलेचा पाठलाग करुन एका इसमाने तिचा विनयभंग केल्याची घटना तालुक्यातील बरफगाव येथे घडली. येथील ५० वर्षीय महिला ११ मे रोजी सायंकाळी मुलाला शोधण्याकरीता जात असतांना गावातीलच भागवत शालीग्राम झांबरे याने तिचा पाठलाग करून गैरवर्तन करत विनयभंग केला. याप्रकरणी सदर महिलेच्या तक्रारीवरुन पि. राजा पोलिसांनी भागवत झांबरे याच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.