मलकापूर शहरातील आठवडी बाजरपरिसरात आढळला अनोळखी इसमाचा मृतदेह
आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- मलकापूर : शहरातील सुभाषचंद्र बोस नगर, आठवडी बाजारजवळ असलेल्या एका दुकानाच्या ओट्यावर अंदाजे ३० वर्षाच्या अनोळखी इसमाचा मृतदेह ११ मे रोजी आढळून आला असून त्या अनोळखी मृत इसमाची ओळख पटविण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
सुभाषचंद्र बोस नगर आठवडी बाजारजवळ असलेल्या पाचपांडे यांचे बंद दुकानाच्या ओट्यावर एका अनोळखी इसमाचा मृतदेह असल्याची माहिती राजकुमार वानखेडे यांनी शहर पो. स्टे. ला दिली. त्यावरून पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पाहणी केली. सदर अनोळखी मृत इसमाचा रंग निमगोरा, उंची १६८ से.मी., अंगात काळे-लाल-पांढरे चौकडी शर्ट, शर्टाचे डावे खिशाजवळ पांढऱ्या टिगरवर तसेच शर्टाचे शेवटचे बटनाजवळ पांढरे शेवटचे (S.B.I) असे लेबल, अंगात निळ्या रंगाची जिन्स पँट व उजव्या हाताचे मनगटावर इंग्रजीमध्ये R.P.P. असे गोंदलेले, केस लांबव दाढी वाढलेली, गळयात लाल पिवळा व काळा धागा असून सदर अनोळखी इसमाची ओळख पटविण्याचे आवाहन शहर पोलिसांनी केले आहे.