Homeबुलढाणा (घाटाखाली)बुलढाणा (घाटावर)
जिल्हाधिकारी कार्यालयात राजे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी
बुलडाणा- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- जिल्हाधिकारी कार्यालयात आज 14 मे रोजी राजे छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. राजे छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त तहसीलदार माया माने यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी तहसिलदार संजीवनी मुपळे, नायब तहसीलदार प्रमोद करे, विधी अधिकारी गजानन पदमने, नाझर गजानन मोतेकर, सुरेश खोडके, नंदकुमार येसकर यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनी राजे छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन केले.