छत्रपती संभाजी महाराजांच्या जयघोषात आसमंत दुमदुमले
बुलढाणा शहरात मोठ्या उत्साहात छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी
बुलढाणा- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी : स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त १४ मे रोजी बुलढाण्यात शोभायात्रा काढण्यात आली. रस्त्या रस्त्यावर लावलेले भगवे ध्वज, घोडेस्वारांचे जिवंत देखावे, चौकाचौकात झालेले शिवकालीन खेळ उपस्थितांमध्ये रोमांच उभे करून गेले. आंध्रप्रदेशातील कावड आणि दिल्लीतील महाकाली पथक या शोभायात्रेचे आकर्षण ठरले होते.धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आ. संजय गायकवाड यांच्या नेतृत्त्वात धर्मवीर आखाड्याच्यावतीने आयोजित छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये १३ मे रोजी सकाळी शहरातून मोटार सायकल रॅली काढण्यात आली होती. १४ मे रोजी सायंकाली संगम चौकातून शोभायात्रेस प्रारंभ झाला. वाहनांवर सजविलेले देखावे, घोड्यांवर स्वार मावळे, त्यातच प्रभु श्रीराम, हनुमान, शिवराय, जिजाऊ, शंभुराजे यांच्यासह अन्य महापुरुषांचे आकर्षक पुतळे शोभायात्रेची भव्यवता दर्शनिन होते
महिलांनी सादर केला पाळणा
बुलढाणा शहरातील धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज स्मारक स्थळी सकाळी पुजाताई गायकवाड व अन्य महिलांच्या उपस्थितीत जन्मोत्सव साजरा करून पाळणा सादर करण्यात आला. सकाळी साडेआठ वाजता हा कार्यक्रम झाला.
पूजन व आरतीनंतर शोभायात्रेस सुरुवात
सायंकाळी आ. संजय गायकवाड वांच्या नेतृत्वात जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष बाळासाहेब धुड, कार्याध्यक्ष आशिष जाधव, मोहन पहाड, संदीप गायकवाड, जीवन उबरहंडे, श्रीकांत गायकवाड यांच्यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत पुजन होऊन आरत करण्यात आली.
चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी जिंकली मने
या मिरवणुकीत मल्ल खांबाचे मुले आणि मुलींनी सादर केलेल्या कसरती, आंध्रप्रदेशातील कावड पथक, शिवकालीन युद्ध कलेची दाखविण्यात आलेली प्रात्याक्षीक उपस्थितांना खिळवून ठेवत होते. मिरणुकीमध्ये मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.