दारुसाठी पैसे मागितल्या वरून वाद वादाचे रूपातंर हाणामारीत
संग्रामपूर- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी :- दारू पिण्यास पैसे मागितले असताना दिले नाही. व घरासमोर दोघात वाद सुरू असताना तिसऱ्याने हस्तक्षेप केला. अशा परस्पर विरोधी तक्रारी दाखल झाल्याने पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याची घटना ग्राम बोडखा येथे सोमवारी घडली.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अमोल ठाकरे यांनी पोलिसात फिर्याद दिली की ते त्यांचे घराजवळ उभे असताना चार ते पाच जण आले दारू पिण्यासाठी त्यांनी पैशाची मागणी केली असता त्यांनी पैसे देण्यास नकार दिला. यावेळी त्यांनी अमोल ठाकरे यांना शिवीगाळ करून लोखंडी रॉडने मारहाण केली. त्यांची पत्नी आवरण्यास आली असता यातील चौघांनी त्यांचे गळ्यातील सोन्याचा हार अंदाजे किंमत ३० हजार रुपये घेऊन ते पळून गेले. ही माहिती कोणाला देऊ नको अशी धमकी दिली. अशा फिर्याद वरून आरोपी श्रीकृष्ण दामोदर भवर बाळकृष्ण दामोदर भवर परस्पर विरोधात तक्रारी ५ जणांविरुध्द गुन्हा विनोद आत्माराम पोफळणारे प्रवीण आत्माराम पोपळणारे सर्व रा. बोडखा यांचे विरुद्ध कलम ३९२,३२४,३२३ ,२९४,५०६ ३४ भादंवि नुसार दाखल करण्यात आला. तर श्रीकृष्ण दामोदर भवर यांनी पोलिसात फिर्यादि दिली की त्यांचा आते भाऊ विनोद पोफळणारे व अमोल ठाकरे यांचे त रस्त्यावर वाद सुरू असताना ते वाद मिटवण्यास गेले असता तू कशाला आमचे मधात आला असे म्हणत लोखंडी पाईपने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली.यावरून अमोल ठाकरे रा . बोडखा याचे विरुद्ध कलम ३२४ ,२९४, ५०४,५०६ भादवी दाखल करण्यात आला. वृत्त लिही पर्यंत यात एकाही आरोपीला अटक झाली नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.