शुल्लक कारणावरून वाद घालत केली मारहाण
जळगाव जामोद- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- : आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:- शुल्लक कारणावरून वाद घालत मारहाण केल्याची घटना जळगाव जामोद तालुक्यातील गोळेगाव हुरसाळ येथे 12 मे रोजी रात्री 8:30 वाजेच्या सुमारास घडली आहे.
सविस्तर वृत्त असे की तक्रारदार अमोल अंबादास घुळे यांनी जळगाव जामोद पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून तक्रारदार यांच्या शेताजवळ राजू देविदास हुरसाळ यांचे शेत असून मागील आठ दिवसापूर्वी राजू देवदास हुरसाळ याने शेतातील डीपी वरील फ्युज तुझ्यामुळे जळतात तू डीपीची काळजी घेत नाही असे म्हणून तक्रारदार यांच्यासोबत वाद केला तेव्हा तक्रारदार यांनी त्यास म्हटले होते की मी काही केले नाही तू मला काही बोलू नको असे म्हटले होते त्यावर आरोपी यांनी तुला एखाद्या दिवशी दाखवीतो अशी धमकी सुद्धा दिली होती.
त्यावरून 12 मे रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास तक्रारदार हे मोटरसायकलने शेतातून घरी जात असताना राजू देवदास हुरसाळ यांचे घरासमोरून जात असताना राजू देवदास हुरसाळ व संतोष देविदास हुरसाळ हे दोघे जवळ येऊन तक्रारदार यांच्याशी वाद घालत होते वाद सुरू असताना संतोष याने त्याच्या हातातील लोखंडी पाईप तक्रारदार यांच्या कपाळावर मारले व राजू याने हातातील कुराड फिर्यादी यांच्या डोक्यात मारून जखमी केले. डोक्याला गंभीर मार लागून रक्त अवस्थेत जखमी केले तेवढ्या तक्रारदार यांचा चुलत भाऊ भागवत हा त्या ठिकाणी आला व त्याने त्यांच्या तावडीतून सोडवून तक्रारदार यांना पोलीस स्टेशनला आणले व आरोपी विरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी फिर्यादी यांच्या तक्रारीवरून आरोपी राजू देवदास हुरसाळ व संतोष देवदास हुरसाळ यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे