दीड महिना लग्नमुहूर्त नाही तर व्यवसायाचा वाजला’बॅण्ड’
बुलढाणा :- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- मार्च-एप्रिल महिन्यांत मोठ्या प्रमाणात लग्नसोहळे उरकले गेले. मे आणि जून महिन्यांच्या विवाह मुहूर्त नसल्याने अनेकांनी एप्रिलमध्येच लग्नाचा बार उडवून टाकला. आता २५ जूनपर्यंत विवाह मुहूर्त नसल्यामुळे नुकतेच लग्न जुळलेल्या वधू-वरांना मुहूर्तासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. दरम्यान, यंदा मुहूर्त अत्यंत कमी असल्याने यावर अवलंबून असलेल्या व्यावसायिकांना मात्र अडचणीचा सामना करावा लागत आहे.
यंदा मे आणि जून महिन्यांत लग्नकार्यासाठी मुहूर्त नाहीत. त्यामुळे बॅण्डवाल्यांपासून ते मंडप डेकोरेशन, मंगल कार्यालय, लॉन, आचारी, केटरर्स, प्रोहित, फोटोग्राफर, टेलरिंग व्यावसायिक आदी लग्नकार्यावर अवलंबून असलेल्या व्यावसायिकांना एकप्रकारे आर्थिक फटका बसणार आहे. मे आणि जून महिन्यांत लग्नतारखांअभावी व्यावसायिकांची चांगलीच पंचाईत होत आहे. यावर्षी विवाहाचे योग गतवर्षीपेक्षा कमी आहेत. दरवर्षी मे आणि जून महिन्यांत विवाह सोहळे मोठ्या प्रमाणात पार पडायचे. यंदा मात्र मे जूनमध्ये गुरू आणि शुक्र या दोन्ही ग्रहांचा एकत्रित अस्त असल्याने या काळात मंगलकार्य करू नये, असे शास्त्र सांगते. दोघांचा एकत्रित अस्त असल्याने मे महिन्यात १ आणि २ रोजी मुहूर्त होते. आता २५ गतवर्षी एप्रिल महिन्यात मे, जूनमध्ये गुरुचा अस्त गतवर्षी मे महिन्यात १४, तर जून महिन्यात जवळपास ११ विवाह मुहूर्त होते. यंदा मे महिन्यातील १ आणि २ तारखा सोडल्या तर मुहूर्त नव्हते. जूननंतर मुहूर्त आहेत. अशी परिस्थिती तब्बल २३ वर्षांनंतर पहिल्यांदा आली आहे.
गतवर्षी एप्रिल महिन्यात गुरूचा असल्याने विवाह सोहळे होऊ शकले नाही. यंदा मात्र मोठ्या प्रमाणात एप्रिल महिन्यात विवाह मुहूर्त आहे. मात्र, मे महिन्यात दोन विवाह मुहूर्त सोडले तर एकही मुहूर्त नव्हता. जून महिन्यात यंदा गुरूचा अस्त असल्याने मुहूर्त नाही. परिणामी विवाह सोहळ्याशी संबंधित व्यावसायिकांना जूनअखेरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.