बुलढाणा शहरातील होल्डिंग काढण्याच्या मोहिमला सुरुवात
बुलढाणा- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी :- बुलढाणा शहरातील होल्डिंग काढण्यास नगरपालिकेने मोहीम सुरू केली आहे. विविध गंभीर स्वरूपाच्या घटना यासमोर येत आहे यामध्ये मुंबईत वादळी पावसामुळे होल्डिंग पडून जवळपास 15 जणांचा मृत्यू झाला होता हे गंभीर स्वरूपाची धक्कादायक घटना समोर आली होती. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार बुलढाणा शहरातील अनधिकृत होल्डिंग फलक काढण्यास नगरपालिकेने सुरुवात केली आहे स्वतः नगरपरिषद चे मुख्याधिकारी श्री गणेश पांडे यांच्या उपस्थितीमध्ये सर्क्युलर रोडवरील फलक हटवण्यात सुरुवात झाली आहे.
मुंबईत वादळाच्या तडाख्यात सोमवारी होल्डिंग पडून मोठी गंभीर दुर्घटना घडली होती या घटनेत जवळपास 15 जणांचा मृत्यू झाला तर जखमींची संख्या सुद्धा जास्त आहे त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी होल्डिंगचे स्ट्रक्चर ऑडिट करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने निवासी उपजिल्हाधिकारी निर्भय जैन यांनी जिल्ह्यातील तेरा तहसीलदार अकरा नगरपालिका व दोन नगरपंचायतीच्या मुख्य अधिकाऱ्यांना पत्र दिले होते. बुलढाणा शहरात मोठ्या प्रमाणात होल्डिंग दिसून येत आहे. जागोजागी कानाकोपऱ्यात होल्डिंग दिसून येत आहे त्यामुळे अशी गंभीर स्वरूपाची घटना होऊ नये यासाठी नगरपरिषद ने आपली मोहीम सुरू केली आहे. त्यामुळे आज सकाळपासून होल्डिंग काढण्यात येत आहे.