Homeक्राईम डायरीबुलढाणा (घाटावर)
भरदिवसा चोरट्याने केल्या आठ बकऱ्या लंपास
बुलढाणा – आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:- भरदिवसा शहरातील इंदिरानगरमधून एका वाहनाद्वारे ८ बकऱ्यांची चोरी करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात बुलढाणा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इंदिरानगरमधील सुनंदा चव्हाण यांनी याप्रकरणी पोलिसात तक्रार दिली. १४ मे रोजी सकाळी १० ते ११ वाजेदरम्यान मोकळ्या जागेत बकऱ्या चारत होती. दरम्यान, पाणी पिण्यासाठी महिला घरी आली. तेवढ्या तीन ते चार अज्ञात व्यक्तींनी एका वाहनात ८ बकऱ्यांना घेऊन पलायन केले. प्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास बुलडाणा शहर पोलिस करत आहेत.