अंत्री येथील २९ वर्षीय युवक बेपत्ता
मोताळा :- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी :- तालुक्यातील अंत्री येथून २९ वर्षीय युवक बेपत्ता झाल्याची घटना १३ मे रोजी उघडकीस आली. याप्रकरणी बोराखेडी पोलिसांनी मिसींग दाखल केली आहे.
अंत्री येथील अमोल दिलीप बोदडे यांनी १४ मे रोजी बोराखेडी पोस्टे. ला दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, त्यांचा लहान भाऊ गोपाल दिलीप बोदडे हा १३ मे ला सकाळी ७ वाजेच्या सुमारास बाहेर कामाला जातो, असे सांगून घरुन निघून गेला. तो घरी परत न आल्याने त्यांचा परिसरात व नातेवाईकांकडे शोध घेतला असता तो मिळून आला नाही, अशा फिर्यादीवरुन पोलिसांनी मिसींग दाखल केली आहे. हरविलेल्या युवकाचा रंग सावळा, उंची १६८ से. मी. आहे. दाढी वाढलेली, अंगात पांढऱ्या रंगाचा शर्ट व जिन्स पँट घातलेला असून उजव्या हातावर लव व इंग्रजीत जी गोंधलेले आहे. पुढील तपास पोना. अमोल खराडे हे करीत आहे.