बदनामीची धमकी देत त्याने केला विवाहितेवर अत्याचार
आरोपी विरोधात बलात्कारासह ॲट्रॉसिटी चा गुन्हा दाखल
बुलढाणा- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:- दिवसेंदिवस महिलांवर अत्याचार होणाऱ्या घटना वाढत चाललेल्या आहे. या गोष्टीला कुठेतरी आळा बसणे गरजेचे आहे. एका खाजगी रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिलेवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. लगतच्या रुग्णालयात कार्यरत असलेल्या एका कर्मचार्याने बदनामीची धमकी देत अत्याचार केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी विरोधात बलात्कारासह ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.सदर घटनेचा पुढील तपास एसडीपीओ सुधीर पाटील हे करीत आहे.
सविस्तर वृत्त असे पीडित महिलेला तिच्या पतीने एक खाजगी रुग्णालयामध्ये परिचारिकेची नोकरी लावून दिली ज्या रुग्णालयात पीडित महिला कार्यरत होती त्याच्या बाजूलाच एक दुसरे रुग्णालय होते तेथे तरूण मुलगा हा कार्यरत होता त्यामुळे आरोपीचे पिढी तिच्या घरी ये जा सुरू झाली दरम्यान आरोपी याने बदनामी आणि मुलांना जीवे मारण्याची धमकी देत पीडितेवर अत्याचार केला 2021 ते 29 फेब्रुवारी 2024 पर्यंत हा प्रकार सुरू होता या प्रकाराला कंटाळलेल्या पिढीतेने अखेर आरोपी विरोधात पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणात आरोपी विरोधात बलात्कारासह ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे सदर घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी हे करीत आहे.