भरधाव बसने पायी जाणाऱ्यास उडविले
अपघातात एक ठार अंजनी बु. बसस्थानकावरील घटना
डोणगांव- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी : अंजनी बुद्रुक येथील अनिल चंदनशिव हे रात्री बसस्थानकावरुण पाई घरी जात होते घरी जात असताना भरधाव एसटी बसने त्यांना जबर धडक दिली त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला सविस्तर वृत्त अशे की अंजनी बुद्रुक येथील अनिल चंदनशिव(वय ४५)हे रात्री पायी जात असताना भरधाव बसने उडविले यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना १४ मे रोजी रात्री घडली. अनिल शिवाजी चंदनशीव रा अंजनी बु. असे मृतकाचे नाव आहे.
अंजनी बु. येथील अनिल चंदनशीव हे गावातील बसस्थानकावर १४ मे रोजी रात्री पायी जात होते. दरम्यान बस क्रमांक एमएच २० बीएल २८८१ च्या चालकाने बस भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून अनिल चंदनशीव यांना धडक दिली. यामध्ये ते गंभीर जखमी झाले होते गावातील नागरिकांनी त्यांच्याकडे धाव घेऊन त्यांना त्वरित उचलले पण त्यावेळेस त्यांचा मृत्यू झालेला होता याप्रकरणी विनोद गोविंदा चंदनशिव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी बसच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याचा पुढील तपास ठाणेदार अमरनाथ नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेका संजय घिके हे करीत आहेत