बुलढाणेकरांनो सावधान जिल्ह्याच्या मुख्यालयी पाणी पुरवठा करणाऱ्या धरणात फक्त 15 टक्के जलसाठा. ..
शहराला 7 ते 8 दिवसानंतर पाणी पुरवठा...
बुलढाणा – आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- मागील काळात पाऊस कमी झाल्याने जिल्ह्यातील प्रकल्पात अत्यल्प जलसाठा शिल्लक राहिला आहे.. तसेच जिल्ह्याच मुख्यालंय असलेल्या बुलढाणा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या येळगाव धरणात आता केवळ 15 टक्के जलसाठा असल्याने बुलढाणेकरांना पाणी टंचाई ला सामोरे जावे लागणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे… अगोदरच झ्यात शेकडो गावात भिषण पाणी टंचाई असल्याने ठिकठिकाणी टँकर ने पाणी पुरवठा केलता जात आहे आता भीषणता वाढली आहे…जिल्हाधिकारी हे या परिस्थितावर बारकाईने लक्ष ठेऊन आहेत… पर्यायी व्यवस्था जिल्हा प्रशासनाच्या वतीने केल्या जात आहे..
बुलढाणा शहरात सध्या 7 दिवसाने एकदा पाणी पुरवठा केल्या जात आहे.. पावसाळा वेळेवर सुरु झाला तर टंचाई चे संकट दूर होईल मात्र पाऊस वेळेवर झाला नाही तर पाणी टंचाई ची तीव्रता वाढणार एवढे मात्र नक्की. त्यामुळे पाण्याचा वापर जपून करावे विनाकारण पाण्याचा गैरवापर करू नये असे आव्हान सुध्दा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे…