शेतकरी पुत्राने कर्जापाई गळफास घेऊन केली आत्महत्या
चिखली – आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- चिखली तालुक्यातील मौजे अंत्री खेडेकर येथील संजय नरहरी खेडेकर वय 33 वर्ष यांनी गट नंबर 992 मेरा बुद्रुक शिवारात नरहारी खेडेकर यांच्या शेतामध्ये लिंबाच्या झाडाला दुरीच्या साह्याने गळफास घेऊन त्यांनी संपवली आहे संजय नरहरी खेडेकर यांच्यावर काही शासकीय बँक खाजगी पतसंस्था तसेच बचत गट व फायनान्स यांचे कर्ज असल्यामुळे त्यांनी कर्जाच्या बोजा पाई कर्जाला कंटाळून आज दिनांक 16 मे 2024 रोजी 12 वाजता शेतामध्ये जाऊन स्वतःची जीवन यात्रा संपली आहे त्यांच्या पश्चात आई-वडील भाऊ बहीण एक मुलगा एक मुलगी पत्नी असा बराच आपत परिवार आहे सदर घटनेची माहिती अंढेरा पोलिस स्टेशन चे ठाणेदार विकास पाटील यांना मिळताच त्यांनी मेरा अंत्री खेडेकर चे बीट जमदार उगले यांनी घटनास्थळी येवुन पंचनामा केला तसेच महसूल विभागाचे तलाठी लखन जाधव व कोतवाल महेश मोरे यांनी घटनास्थळी येऊन सदर घटनेची माहिती चिखली तालुक्याचे तहसीलदार श्री काकडे साहेब यांना दिली आहे