Homeक्राईम डायरीबुलढाणा (घाटावर)

निमगाव वायाळ येथील किराणा दुकानाला आग

लाखो रूपायांचे किराणा माल आगीच्या भक्ष्यस्थानी

Spread the love

 

सिंदखेडराजा : आपलं बुलढाणा जिल्हा बातमी : अनिल दराडे – सिंदखेडराजा तालुक्यातील निमगाव वायाळ येथील ईश्वर किराणा  दि 16 मे रोजी सकाळी आग लागली असून या किराणा दुकानातील लाखो रूपये किंमतीचा किराणा माल आगीच्या भक्ष्यस्थानी पडून जळून खाक झाला असून किराणा दुकानदार जखमी झाल्याची घटना निमगाव वायाळ येथे घडली आहे सदर आग शॉटसर्किटने लागल्याचा प्राथमिक अंदाज आहेत या अग्नीतांडवात दुकानातील साहित्य व घरगुती सामानाचे जवळपास दोन लाखांपर्यंत नुकसान झाल्याचा अंदाज आहे
दुकानातील विद्युत वितरण वायरमध्ये शॉटसर्किटने ही आग लागल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले या शॉटसर्किटने दुकानातील झोपण्याचे कपड्यांनी पेट घेतल्याने दुकानातून आगीचे लोट बाहेर पडले या वेळी दुकानदार दलसिंग मानसिंग देव्हरे यांच्या कपड्यांनी पेट घेतल्याने ते दुकानाबाहेर पळालयाने गावातील नागरिकानी त्यांच्या अंगावरील आग विझवून त्यांना तात्काळ पुढील उपचारासाठी खाजगी दवाखान्यात भरती करण्यात आले यावेळी उपस्थित नागरिकानी दूकानातील आग विझवण्यासाठी पाण्याचा वापर करून आग आटोक्यात आणली मात्र या आगीच्या भक्ष्यस्थानी किराणा दुकानातील गोडेतेल साखर चिपचे पुडे बिस्किटे व कोल्डड्रिंक्स व फ्रिज जळून खाक झाले आहे तसेच घरगुती सामनामध्ये कांदे व मोठ्या प्रमाणात आंबे जळून खाक झाले आहे सदर घटनेची माहिती मिळताच निमगाव वायाळ चे तलाठी विष्णू थोरात यांनी भेट देऊन झालेल्या नुकसानीचा पंचनामा केला आहे

निमगाव वायाळ येथे महावितरण कंपनीने एक महिन्यापूर्वी गावामध्ये केबल टाकल्यापासून गावातील विद्युत प्रवाह हा कमी जास्त दाबामध्ये प्रवाह होत असल्याने शॉर्टसर्किट चे प्रमाण वाढले आहे याबाबत महावितरण कडे अनेकवेळा तोंडी व लेखी तक्रार करूनही काहीच फायदा झाला नाही स्थानिक लाईनमन हा मुख्यालयी हजर राहत नसल्याने असे प्रकार घडत असलयाची चर्चा ? परिसरात जोर धरत असल्याने संबंधित लाईनवर तात्काळ कार्यवाही करावी अशी जनतेची मागणी आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page