विकास सुखधाने यांना २०२४ चा राज्यस्तरीय “बहुजनरत्न जीवन गौरव,,पुरस्कार जाहीर
साहित्य क्षेत्रांतल्या उल्लेखनीय कार्याबद्दल होणार सम्मानीत
चिखली- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- ऋणानुबंध समाज विकास संस्था चिखली द्वारा संचलित तुकाराम आश्रय वृद्धाश्रम भोकर ता. चिखली जि. बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमानाने दिला जाणारा मान सन्मान आणि कर्तुत्वाचा २०२४ या वर्षीचा “बहुजनरत्न जीवन गौरव राज्यस्तरीय पुरस्कार हा मेहकर तालुक्यातील नांद्रा वरदडी येथील सुप्रसिध्द आदर्श युवा साहित्यिक लेखक कवी विकास सुखधाने यांना जाहीर झाला आहे.आपल्या वास्तववादी साहित्य लेखणीतून विकास सुखधाने यांनी शोषित, वंचित, पिडीत ,शेतकरी कष्टकरी कामगार ,गोर ,गरीब मजूर यांच्या व्यंथांना वाचा फोडली आहे.सन्मान नेतृत्वाचा राज्यस्तरीय बहुजन रत्न सन्मान सोहळा २०२४ बहुजन महापुरुषांच्या विचारावर विविध क्षेत्रांत उल्लेखनिय कार्य करणाऱ्या व्यक्तिंना सदर पुरस्कार दिल्या जातो,बहुजन चळवळीत आत्मविश्वासाने आणि जिद्दीने आपले ध्येय साध्य करीत आलेल्या,आपल्या कार्यक्षेत्रामध्ये खंबीरपणे उतुंग कामगिरी करुन बहुजन समाजाच्या कल्याणासाठी सतत धडपड करत असणाऱ्या संघर्षातून मोठे यश मिळवणाऱ्या व्यक्तींची बहुजन रत्न जिवन गौरव राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड केली जाते, विकास सुखधाने यांनी समाज आणि साहित्य कार्यक्षेत्रामध्ये खंबिरपणे उत्तुंग कामगिरी केली असता . त्यांची बहुजन समाजाचे कल्याणासाठी सतत लेखणीतून धडपड चालू आहे.संघर्षातून मिळालेल्या याच दैदिप्यमान यशा बद्दल निवड समितीने साहित्यिक लेखक कवी विकास सुखधाने यांची राज्यस्तरीय” बहुजन रत्न जीवन गौरव ,, पुरस्कारासाठी त्यांची निवड केली आहे.सदर पुरस्कार हा त्यांना राज्यातील लोकप्रतिनिधी, जेष्ठ पत्रकार, शासकिय,अधिकारी व जेष्ठ सामाजिक नेते यांच्या प्रमुख उपस्थितीत दि. ३१ मे २०२४ रोजी दुपारी २ वाजता पंचशील बुद्ध विहार गजानन नगर चिखली येथे मान सन्मानाने प्रदान करण्यात येणार असल्याचे.आयोजक
मा.प्रशांत भैया डोंगरदिवे संस्था अध्यक्ष सौ.लता अविनाश डोंगरदिवे यांनी निवडपत्रा द्वारे कळवले आहे.जाहिर झालेल्या पुरस्कार बद्दल सर्व क्षेत्रांतून विकास सुखधाने यांचे अभिनंदन व कौतूक केले जातं आहे