नवऱ्याने केली बायकोला बेदम मारहाण
उपचारादरम्यान बायकोचा मृत्यू देऊळघाट येथील धक्कादायक घटना
बुलढाणा:-आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- बुलढाणा तालुक्यातील देउळघाट येथून अतिशय खळबळ जनक धक्कादायक घटना समोर आली आहे. नवऱ्याने पत्नीला मारहाण केल्यामुळे दवाखान्यात भरती असलेल्या महिलेचा मृत्यू झाला याप्रकरणी मृत महिलांच्या भावाने बुलढाणा ग्रामीण पोलिसात तक्रार दिली त्यावरून मोसिन खान मोबीन खान रा. देऊळघाट याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार अक्सा परवीन असे मृत महिलेचे नाव आहे त्यांचे भाऊ शेख समीर शेख खाजा यांनी बुलढाणा ग्रामीण पोलिसात तक्रार दिले त्यानुसार बारा वर्षांपूर्वी त्यांची बहीण अक्सा परवीन यांचा विवाह देऊळघाट येथील मोसिन खान मोबीन खान यांच्याशी झाला होता तो नेहमी किरको कारणावरून घरी वाद करायचा आणि पत्नी अक्सा परवीन यांना मारझोड करायचा 13 मे रोजी दुपारी शेख समीर यांना आरोपी मोसिन खान यांचा फोन आला.
त्यावेळी त्यांनी सांगितले की बहीण अक्सा परवीन हिला बुलढाण्यातील मल्टी स्पेशलिस्ट दवाखान्यात भरती केले आहे त्यानंतर शेख समीर यांनी हॉस्पिटल गाठून बहिणीची विचारपूस केली तेव्हा किरकोळ कारणावरून वाद होऊन मारहाण झाली चापट बुक्यांनी पोटात मारहाण झाल्याने पोटात दुखत आहे. पोटाच्या आत गंभीर स्वरूपाची दुखापत झाल्याचे त्यांना बहीण अक्सा परवीन यांनी सांगितले दरम्यान काल सकाळी 10:30 वाजेच्या सुमारास उपचार सुरू असतानाच अक्सा परवीन यांचे निधन झाले तत्पूर्वी आरोपी मोसिन खान याने सांगितले होते की जर तुम्ही तक्रार दिली तर मी तुझ्या बहिणीला वागवणार नाही व तिला जीवनी मारून टाकीन असे तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान अंत्यविधी झाल्यानंतर मृतक महिलेचा भाऊ शेख समीर यांनी तक्रार दिली प्राप्त तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी मोसिन खान याच्याविरुद्ध काल रात्री उशिरा पुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे