घरासमोर उभी असलेले कार अज्ञात चोरट्याने केली लंपास
सिंदखेडराजा:- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- नेहमीप्रमाणे घरासमोर उभी असलेले कार अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना 16 मे 2024 ते 17 मे 2024 दरम्यान घडली आहे.
सविस्तर वृत्त असे की तक्रार करते किशोर लक्ष्मण वाघमारे वय 48 रा नाव्हा टी पॉईंट ता. सिंदखेड राजा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सन 2014 मध्ये मारुती सुझुकी कंपनीची स्विफ्ट डिझायर पांढरा रंगाची का क्रमांक एम एच 28 वी 8804 अशी नवीन कार घेतली होती त्यापासून आजपर्यंत ही कार माझ्या ताब्यात होती. दिनांक 16 मे 2024 रोजी रात्री दहा वाजे दरम्यान कार दररोज प्रमाणे घरासमोर पार्किंग करून ठेवली होती लग्नाचा वाढदिवस असल्या कारणाने घरी कार्यक्रम असल्याने सर्वजण जागीच होते.रात्री 3:30 वाजेच्या दरम्यान बाहेर येऊन गाडी पाहून घराच्या समोरील गच्चीवर सर्वजण झोपले होते सकाळी सहा वाजे दरम्यान बाहेर येऊन पाहणी केली असता घरासमोर पार्क केलेली स्विफ्ट डिझायर पांढऱ्या रंगाची कार अंदाजे किंमत 3 ,75,000 रुपयांची कार अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. पोलिसांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सदर घटनेचा पुढील तपास सिंदखेडराजा पोलीस करीत आहे