बुलडाणा ( आपलं बुलढाणा जिल्हा बातमी) – मे महिन्याच्या सुरुवाती पासूनच उन्हाचा जोर आणखी तीव्र झाला. रोहिणी नक्षत्राला सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकरी कामाला लागला. खरीप हंगामातील पेरणी पूर्व शेतीची कामे शेतकरी उरकून घेत आहेत. बुलडाणा तालुक्यात शेतीच्या मशागतींच्या कामाला वेग धरला आहे. नैसर्गिक आपत्ती आणि शेतमालाच्या नेहमीच घसरणार्या दरामुळे शेतकर्यांची आर्थिक परिस्थिती खालावली आहे.
पूर्वी जमिनीची मशागत बैल जोडीने केली जात होती. बैलाच्या गळ्यातील गोघर -घाटीचा मंजुळ आवाज ऐकावयास मिळत होता. परंतु, बदलत्या काळानुसार व विज्ञान युगामध्ये शेतीची मशागत ट्रॅक्टरच्या साह्याने केली जाऊ लागली आहे. त्यामुळे आत्ता बैलांची संख्या कमी झालेली दिसून येते. अगदी मोजया शेतकर्याकडे बैलजोडी दिसून पडते. जरी विज्ञान युगामध्ये अत्याधुनिक यंत्राच्या साह्याने शेती केली जात असली, तरी ठराविक कामे बैलांच्या साह्याने केली जातात. आता बर्याच शेतकर्यांकडे ट्रॅक्टर आहे. त्यामुळे जमिनीची मशागत ट्रॅक्टरणे करताना दिसून येत आहेत. डिझेलचे भाव वाढल्यामुळे जमीन नांगरणीचे दरात वाढ झाली आहे. गेल्या वर्षापर्यंत एकरी ११०० ते १२०० रुपये भाव होता. यावर्षी त्यात वाढ करण्यात आली आहे सर्वसामान्य शेतकर्यांना हा दर परवडणार नाही. मालाला भाव मिळत नाही.गेल्या चार-पाच दिवसापासून ढगाळ वातावरण तयार होऊन लागले आहे.शेतीची नांगरणी बैलजोडीने किंवा ट्रॅक्टरद्वारे करतांना दिसून येते आहे. नांगरणी झाल्यावर त्याची वखरणी करून त्यात शेणखत मिळवण्याच्या कामे करून पुन्हा जमीन बैलजोडीच्या साह्याने किंवा ट्रॅक्टरने बैलाच्या साह्याने कामे सुरू आहेत. त्यामुळे शेतकरी शेतात नांगरणी, वखरणी नंतर जमीन पेरणी योग्य करून ठेवत आहे. यंदा पेरणीस लवकर सुरुवात होणार अशी खात्री शेतकर्यांना आहे. त्यामुळे पेरणीपूर्व कामांना वेग आला आहे.