Homeक्राईम डायरीबुलढाणा (घाटावर)
किराकोळ कारणावरून 50 वर्षीय महिलेला घरात घुसून शिवीगाळ करत केली मारहाण
देऊळगाव राजा- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- तालुक्यातील गिरोली खुर्द येथे एका ५० वर्षीय महिलेच्या घरात घुसून किरकोळ कारणावरून अश्लील भाषेत शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना दि. १६ मे रोजी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी तीन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तुझ्या पोराचा काटा काढतो व तुला एखाद्या दिवशी जीवाने मारून टाकीन, अशी धमकी दिल्याचे महिलेने पोलिसांना दिलेल्या फिर्यादी म्हटले आहे. याप्रकरणी आरोपी लक्ष्मण श्रीराम टेकाळे, रामदास लक्ष्मण टेकाळे, एकनाथ लक्ष्मण टेकाळे (सर्व रा. भूमराळा, ता. लोणार) यांच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल रामेश्वर जायभाये करीत आहेत.