घरातून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरट्यांनी केली लंपास
शेगाव- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- शहरातील खामगाव रोडवर होंडा शोरूम जवळ राहत असलेल्या एका व्यक्तीच्या घरामध्ये अज्ञात चोरट्याने प्रवेश करून घरातील कपाटातून नगदी ७० हजार व सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण १ लाख ९ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना दि १५ मे च्या रात्री घडली.
याप्रकरणी शेगाव शहर पोलिसांनी तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा नोंदवला आहे. जुलकर नैन अब्दुल सत्तार हे खामगाव रोडवरील होंडा शोरूम जवळ राहतात. ते निजामाबाद येथे गेले होते. दरम्यान घरी कोणी नसल्याचे पाहून अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करून घरात हज येथे जाण्याकरता जमा केलेला लोखंडी अलमारीमध्ये ठेवलेले नगदी ७० हजार रुपये, सोन्याची ३ ग्रॅमची अंगठी, ३ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत, चांदीची चेन पट्टी अंदाजे वजन तेरा तोळे व सोन्या चांदीचे इतर दागिने असा एकूण १ लाख ९ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी जुलकर नैन यांनी शेगाव शहर पोलिस स्टेशनला तक्रार दिली असून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम ४५७, ३८० भादवी अन्वये गुन्हा दाखल केला आहे.