खामगावः- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- भरधाव दुचाकी रस्ता दुभाजकावर आदळून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार झाला. खामगाव-नांदुरा रस्त्यावरील एका – इंडस्ट्रीजसमोर ही घटना शनिवारी दुपारी १२:३० वाजताच्या दरम्यान घडली.प्राप्त माहितीनुसार, आनंद वसंत कुळकर्णी शनिवारी दुपारी दुचाकीने शहराकडे येत होते. दरम्यान, सुटाळानजीक असलेल्या इंडस्ट्रीजसमोर त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे दुचाकी रस्ता दुभाजकावर आदळली. यात डोक्याला इजा पोहोचल्याने ते गंभीर जखमी झाले. जखमी अवस्थेत त्यांना खामगाव येथील सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले. तेथे तपासणीअंती डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अलिकडील काळात खामगाव-नांदुरा मार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले असल्याचे चित्र आहे.
With Product You Purchase
Subscribe to our mailing list to get the new updates!
Lorem ipsum dolor sit amet, consectetur.
Related Articles

आज मेहकर येथे केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांचा हस्ते आदर्श ग्रामीण आरोग्य संशोधन केंद्राचे भूमिपूजन ….
2 days ago

अभिनव हेल्थ क्लब आणि संत निरंकारी मंडळ ब्रँच मलकापूरच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग शिबिर संपन्न
3 days ago