Homeक्राईम डायरीबुलढाणा घाटाखाली
अल्पवयीन मुलीस दुसऱ्यांदा फुस लावून पळवले
शेगाव- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- घरी कोणी नसताना अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेल्याची घटना शुक्रवारी घडली. याप्रकरणी तक्रारीवरून बार्शिटाकळी तालुक्यातील पिंपळखुटा येथील युवकाविरुद्ध शेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला. युवकाने तिला दुसऱ्यांदा पळवून नेल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
याबाबत मुलीच्या आईने शहर ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार फिर्यादी कामाला गेलेली असताना १६ वर्षीय मुलगी ही एकटीच घरी होती- फिर्यादी घरी परतल्यावर मुलगी घरी आढळली नाही. परिसर क नातेवाइकांकडे शोध घेतला. ती न सापडल्याने मुलीला आरोपीने पळवून नेल्याचे म्हटले आहे. आरोपीने मुलीला एक वर्षाआधीही पळवून नेल्याचे नमूद आहे. तक्रारीनुसार सागर मनोहर तायडेवर गुन्हा दाखल केला आहे.