ट्रक व दुचाकी अपघातात तोरणवाडा येथील युवक ठार
उदयनगरः – आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- ट्रक व दुचाकीचा अपघात झाल्याने तोरणवाडा येथील एक ४५ वर्षीय युवक गंभीर जखमी झाला होता सदर घटना १७ मे रोजी दुपारी ४:३० वाजेच्या सुमारास येथील किसनदेव महाराज मंदिरासमोर घडली असून जखमीवर चिखली येथे उपचार सुरू असतांना रात्री ८ वाजेच्या सुमारास प्रांणज्योत मालवली.
तोरणवाडा येथील दीपक नामदेव बिबे वय ४५ वर्षे हे आपल्या ताब्यातील दुचाकी ने अमडापुर कडून उदयनगर कडे येत असतांना किसन देव महाराज मंदिरासमोर दुचाकी व ट्रक क्रमांक एम. पी. ०४ १८१३ चा अपघात झाला यात दुचाकी स्वार दीपक बिबे गंभीर जखमी झाले असून पायाच्या मांडीनजीक चांगलाच मार लागला त्यांना उपस्थितांच्या मदतीने तात्काळ उदयनगर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या १०२ रुग्णवाहिकेने चालक सतीश रावळकर यांनी पुढील उपचारासाठी चिखली, येथील खासगी दवाखान्यात
दाखल केले तेथे उपचार सुरू असतांना रात्री ८ वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली मृतक दीपक वर १८ मे रोजी दुपारच्या सुमारास तोरणवाडा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले सदर दुःखद घटनेमुळेउदयनगर तोरणवाडा सह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे दिपकच्या पश्चात भाऊ, बहीण पत्नी, मुलगा, मुलगी असा आप्तपरिवार आहे
अपघाताची मालिका सुरूच….
येथून गेलेला महामार्ग हा गावातून अरुंद असून रुंदीकरणाचे काम गेल्या ४ ते ५ वर्षापासून रखडलेले आहे. त्यातच कंत्राटदार कंपनीने रुंदीकरणा अगोदरच अरुंद रस्त्यावर दुभाजक टाकलेले आहे. त्यामुळे उदयनगर पास करतांना रस्ता अरुंद असल्यामुळे मोठ्या वाहन चालकाच्या नाकी नऊ येत आहेत. ४ दिवसापूर्वी सुद्धा कार व ट्रकचा अपघात झाला तर शनिवारी पुन्हा दुचाकी व ट्रकचा अपघात होत एकाला आपला जीव गमवावा लागला करिता प्रशासनाने रुंदीकरण तात्काळ करावे अन् रुंदीकरण होत नसेल तर किमान दुभाजक तरी काढून टाकावे. अशी रास्त अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.