चरित्रावर संशय घेऊन पत्नीचा खून करणाऱ्या त्या नराधम आरोपीला मिळाली दुहेरी जन्मठेपेची शिक्षा….
जिल्हा सरकारी वकील ॲड वसंत भटकर यांच्या प्रभावी युक्तीवादाने गजानन अपराधी सिध्द करण्यात महत्वाची भूमिका
बुलढाणा – आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:- सगळ्यातत घातक जर काही असले तर तो राग आहे.रागच्या भरात माणूस काय करणार याचा काही नेम नाही. कुठल्याही थरारावर तो जाउ शकतो.असाच एक प्रकार बुलढाणा शहरात घडला होता. चरित्रावर संशय घेऊन पत्नीचा खून करणाऱ्या त्या नराधम आरोपीला अखेर आज दि 20 मे रोजी जिल्हा सत्र न्यायालयाने दुहेरी जन्मठेपेची शिक्षा व 16500 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.जिल्हा सरकारी वकील ॲड वसंत भटकर यांच्या प्रभावी युक्तीवाद गजाननला अपराधी आरोपी सिद्ध करण्यात महत्वाची भुमिका बजावणारा ठरला आहे.
सविस्तर वृत्त असे की त्रिशरण चौकाजवळील स्मशानभूमी जवळ असलेल्या जगदंबा नगरात पूजा उर्फ गीता ही आपल्या आई-वडिलांकडे मुलीसह राहात होती. 2011 मध्ये आरोपी गजानन विश्वनाथ जाधव वय 35 राहणार जालना याच्यासोबत रीती रिवाजाप्रमाणे लग्न झाले होते लग्न झाल्यानंतर सदर लग्न संबंधापासून आरोपी गजानन पासून पूजा हिला तीन मुली झाल्या आहेत परंतु आरोपी गजानन हा नेहमी पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण करीत होता व शारीरिक व मानसिक छळ सुद्धा करीत होता. पूजाचे वडील सुरेश तायडे हे नेहमी पूजा व आरोपी गजानन यांना समज देऊन नांदवयास पाठवत होते. सततच्या त्रासामुळे कंटाळून पूजाही अंदाजे जून 2021 मध्ये एक ते दीड महिन्यापूर्वी दोन मुलीसह माहेरी आली होती. एक मुलगी हि पतीकडे होती.तर श्रेया आणि श्रृती या पुजा सोबत बुलढाणा येथे आल्या होत्या. आरोपी गजानन हा 8 ऑगस्ट 2021 रोजी संध्याकाळी पत्नीला भेटण्यासाठी जालन्यावरून बुलढाण्याला आला .सासरी जेवण झाल्यानंतर तो मुक्का थांबला.दुसऱ्या दिवशी त्यांचे सासरे सुरेश तायडे,सासू सकाळीच कामानिमित्त बाहेर गेले.तर पुजाची बहिण अश्वविनी सुध्दा बाहेर कामानिमित्त गेली. सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास श्रेया आणि श्रृती बाहेर खेळत होत्या.पत्नी घरात एकटीच होती. गजाननच्या डोक्यात भलतीच डाळ शिजत होती.आणि त्याने तो डाव साधला पत्नीचे आईवडील आणि बहिण कुणीच घरी नाही.आता हिचा खेळ खलास करून टाकू असा विचार गजाननच्या मनात आला त्याने संधी शोधली आणि पत्नीला काही कळण्याच्या आता त्याने तिच्यावर दोन चाकूंनी सपासप वार केले. एक नव्हे दोन नव्हे तब्बल 8 वार त्याने केले.पत्नी पुजा हि रक्ताच्या थारोळ्यात पडली.तिला मरणाच्या अवस्थेत सोडून गजानन हा बाहेर पडला व बाहेर खेळत असलेल्या दोन्ही मुलींना घेतले आणि बाजूला असलेल्या संगम तलावाच्या दिशेने धावत सुटला इकडे जगदंबा नगरमधील लोकांना काही कळण्याच्या आतच गजानने दोन्ही मुलींना घेउन तलावात उडी मारली परंतू देव तारी त्याला कोण मारी तलावाच्या काठी असलेल्या लोकांनी गजानन सह मुलीचे प्राण वाचविले इकडे रक्तबंबाळ अवस्थेत लोकांनी पूजाला जिल्हा रूग्णालयात आणिले.परंतू प्रचंड रक्तस्तोत्र झाल्यामुळे तिचा मृत्यू झाला. आरोपी गजानन याला शहर पोलिसांनी ताब्यात घेतले.त्याने खुनाची कबुली दिली. जिल्हा सत्र न्यायालय बुलढाणा येथे आरोपीविरुद्ध खटला सुरू झाला व आज जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपी याला दुहेरी जन्मठेपेची शिक्षा व 16 हजार पाचशे रुपयांचा दंड ठोकला आहे.
सदर खुनाचा तपास असा केला
पीएसआय सुधाकर गवारगुरू यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेउन वस्तुस्थिती जाणण्याचा प्रयत्न केला.त्यांनी पंच,फोटोग्राफर फॉरेसिक टीम,फिंगरप्रीट एक्सपर्ट यांना बोलावून घटनास्थळ पंचनामा केला घटनास्थळी दोन रक्ताने भरलेले चाकू,व घटनास्ळावरील रक्ताचे नमुने जप्त केलेले होते त्यानंतर मयताचे वडील सुरेश दत्तू तायडे यांनी पोस्टे घटनेची रितसर तक्रार दिली. त्यानुसार आरोपी गजानन विरूध्द भादवी कलम 302 व 498 अ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला त्यानंतर तपास अधिकारी गवारगुरू यांनी उर्वरित गुन्ह्याचा तपास करून भा.द.वि.चे कलम 302,307,309,336,498 अ व आर्म ॲक्ट चे कलम 4.25 नुसार न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल केले…
सरकारी वकिल ॲड भटकर यांनी तपासले 15 साक्षीदार…
दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर सदर खटला हा पुराव्याकामी लागल्यानंतर आरोपी विरूद्ध दोषसिद्धी होण्याच्या दृष्टीकोणातून जिल्हा सरकारी वकिल ॲड वसंत भटकर यांनी 15 साक्षीदार तपासले.त्यापैकी घटनास्थळाच्या शेजारी राहणाऱ्या साक्षीदार स्वाती चव्हाण,सविता सावंत,दिनकर पवार, व संतोष खिल्लारे यांनी साक्ष्य महत्वाची राहिली.त्यांनी आरोपीला घटनास्थळावरून जातांना पाहिले होते. तसेच मयत व आरोपी गजानन याची दहा वर्षीय मुलगी श्रृती हिने सुध्दा बापाविरोधात साक्ष दिली. एकदरीत घटनास्थळावरून आढळून आलेली परिस्थिती व वैदकीय पुरावे यांची सांगड घालणारी प्रभावी युक्तीवाद ॲड भटकर यांनी केला. आरोपीचे कपड्यावर आणि जप्त केलेल्या चाकूवर आढळलेले रक्त तसेच फिंगरप्रिंट एक्सपर्ट यांनी एका चाकूवर आरोपीचे .फिंगरप्रिंट असल्याचा अहवाल दिला होता.