भरधाव दुचाकीच्या धडकेत युवक गंभीर जखमी
खामगाव :- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- भरधाव दुचाकीने धडक दिल्याने दुचाकीचालक युवक गंभीर जखमी झाला. ही घटना कृषी उत्पन्न बाजार चौकात रविवारी रात्री घडली.
तक्रारीनुसार, येथील रेखा प्लॉट भागातील रहिवासी आकाश गणेश कोळसे (वय ३२) रविवारी रात्री मित्राचे दुकान बंद करून त्याच्या सोबत एमएच २८ बीजी ५१४३ या दुचाकीने घरी परतत होते.दरम्यान, कृषी उत्पन्न बाजार समिती चौकातील वळणावर एमएच २८ एएम ९०५८ च्या चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवित कोळसे यांच्या दुचाकीला धडक दिली. यात खाली पडल्यामुळे त्यांच्या डाव्या पायाला आणि हाताला गंभीर दुखापत झाल्याचे तक्रारीत म्हटले. याप्रकरणी पोलिस तक्रार आणि वैद्यकीय अहवालावरून शहर पोलिसांनी संशयित दुचाकीस्वाराविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.