भगवान गौतम बुध्द जयंतीचे सहकार विद्या मंदिर येथे आयोजन…
बुलढाणा – आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- येथील सहकार विद्यामंदिरात दरवर्षी प्रमाणे तथागत भगवान गौतम बुध्द यांची जयंती वैशाख पौर्णिमा गुरुवार, २३ मे रोजी सकाळी आठ वाजता आयोजित करण्यात आली आहे.
जयंती कार्यक्रमास पुज्यनिय यश भंते, श्रीलंका, पुज्यनिय जिवक बोधी भंते यांच्या शुभहस्ते बुध्द वंदना परित्राण पाठ घेवून बुध्द जयंती साजरी करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, जिल्हा पोलीस अधिक्षक सुनिल कडासने, बुलडाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक उपाख्य भाईजी, संस्थेचे चिफ मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. सुकेश झंवर, बुलडाणा अर्बन चॅरिटेबल सोसायटीच्या अध्यक्षा कोमल सुकेश झंवर, अतिरिक्त आयुक्त आयकर विभाग, पुणेचे राजेश गवळी, इगतपूरी विपश्यना केंद्रचे आचार्य तेजराव इंगळे यांची उपस्थिती लाभणार आहे.तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अदृष्य आभासी पुतळयाचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. तरी या जयंती महोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन बुलडाणा अर्बन परिवाराच्या वतीने तसेच सहकार विद्यामंदिर बुलडाणा यांच्यावतीने करण्यात आले आहे.