Homeबुलढाणा (घाटावर)

लाख रुपये खर्च केले पण गावाला पाणी नाही आले मुरादपूरचा पाणी प्रश्न पेटणार

Spread the love

सिंदखेडराजा – आपलं   बुलढाणा जिल्‍हा बातमी- अनिल दराडे – चिखली तालुक्यातील मौजे मुरादपुर ता चिखली जि बुलढाणा मतदार संघ सिंदखेडराजा येथे पाणि टंचाई निवारणासाठी आतापर्यंत शासणाचे लाखो नाही कोरोडो रुपये खर्च होवुन ही गावातील पाणीटंचाई जैसै थे आहे तरी 2009 मधे महाजल योजना गावासाठी सुरु झाली पण एक थेंब ही पाणी गावात आणु शकली नाही तक्रारी झाल्या परंतु ठेकेदार व पाणीपुरवठा कर्मचारी यांनी त्यांच्या आर्थीक फायद्यामुळे कोणतीही चौकशी न करताच दुसरी पेयजल योजना सन 2014मधे सुरू केली त्यामधे सुध्दा चौकशी न करताच परस्पर निधी काढुन ठेकेदार व सरपंच अधिकारी यांनी पाणी मुरविले सदर कर्मचारी ईंजीनीयर अधिकारी येवढ्यावरच न थांबता त्यांच्या टक्के वारी साठि गावाची पर्वा न करता गावकर्याना विश्वासात न घेता जलजीवन मिशन योजना मंजुर करण्यात आली व सदर योजणे बाबत विविध तक्रारी करुन सुध्दा तक्रारीची दखल न घेता व चौकशी न करताच ठेकेदार व सरपंच व पती यांच्या आर्थिक लाभासाठी सदर योजणा कोणत्याही स्वरुपाचे प्रयोजन नसताना केवळ आर्थिक लाभासाठी सदर योजना मंजुर करण्यात आली आहे वेळोवेळी तक्रार दाखल केली असता सदर विभागातील अधिकारी कर्मचारी यांनी आजपर्यंत कोणत्याही प्रकारची चौकशी केली नाही तरी मुरादपुर येथे आज रोजी भिषण पाणिटंचाई आहे तसेच ग्रां प अंतर्गत गावात काही धनदांडग्या लोकांनी त्यांच्या वैयक्तिक पाईप लाईन टाकुन घरी पाणी आणले आहे परंतु गोर गरीब जनतेला भिषण पाणिटंचाई चा सामणा करावा लागत आहे व ग्रा प ठेकेदार आता डोळे मिटून शांत आहे परंतु गरीब जनतेला याच्या झळा सोसाव्या लागत आहे तर सचिव यांनी ठेकेदार व अधिकारी कर्मचारी यांच्या फायद्यासाठी बोगस ग्रामसभा घेऊन जो कारणामा केला तसा पाणीटंचाई साठी काही सुचते का येव्हढा प्रश्न गावातील सर्व सामान्य नागरिकांना पडलेला आहे व महाजल व पेयजल जलजीवन मिशन योजणेचे पाणी नेमके कुठे मुरले याची व अधिकारी कर्मचारी ईंजीनीयर व सरपंच यांची चौकशी व्हावी व मुरादपुर येथील आजपर्यंत न अनुभवलेली भिषण पाणिटंचाई यावर पाणिपुरवठा अधिकारी यावर काही उपाय करताता का याकडे सर्व सामान्य नागरिकांना पडलेला प्रश्न आहे तरी सदर महाजल व पेयजल व जलजीवन मीशन या मधे झालेल्या अनलीगल कामाची व भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी व दोषींवर कारवाई व्हावी सर्व सामान्य नागरिकांची ईच्छा व विष्णु महाराज गाडेकर उपसरपंच यांनी केलेल्या वेळोवेळी तक्रारीची दखल घेऊन गावकर्यांच्या पाण्याचा प्रश्न मिटवुन ठेकेदार व अधिकारी कर्मचारी ईंजीनीयर यांची चौकशी व्हावी व कारवाई करावी अशी मागणी मुरादपुर उपसरपंच विष्णु महाराज गाडेकर यांनी वेळोवेळी केली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page