नूतन ज्युनियर कॉलेजचा 94.24 निकाल , प्रावीण्य श्रैणीत मुली अव्वल स्थानावर
सिंदखेडराजा- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- अनिल दराडे- सिंदखेडराजा तालुक्यातील किनगाव राजा येथील नूतन कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल 94.24 / टक्के असून उज्वल यशाची परंपरा कायम ठेवली आहे विज्ञान शाखेमधील कुमारी देशमुख आदिती व कु. वाघ आर्या या दोघींनी 87% गुण मिळवून कॉलेजमधून प्रथम क्रमांक पटकावला तसेच कु.बकाल स्वामिनी ने 84/टक्के घेऊन दुसरा क्रमांक मिळवला आणि कु. राजनंदिनी शिंगणे येणे 83. 84 टक्के गुण मिळवून तिसरा क्रमांक मिळवला आहे विज्ञान शाखेमध्ये प्राविण्य श्रेणी 17 आणि प्रथम श्रेणीमध्ये 91 तर द्वितीय श्रेणीमध्ये 24 विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले तसेच कला विभागातून कुमारी उषा काळे हिने 75 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला असून द्वितीय क्रमांक मोनिका आवारे 68% गुण मिळाले तर तृतीय क्रमांक कुमारी जान्हवी देशमुख 63 टक्के गुण मिळाले असून कला शाखेमध्ये प्राविण्यश्रेणीत 1 प्रथम श्रेणीमध्ये 6 द्वितीय श्रेणी मध्ये 9 असून प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचे शाळा महाविद्यालयाचे प्राचार्य सतीश जाधव व त्यांचे सहकारी प्राध्यापक वर्ग व शिक्षक वृंद यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले