धक्कादायक घटना खामगावात जिल्हा परिषद शाळेला मध्यरात्री भीषण आग!
आगेत शाळेतील साहित्य जळून झाले खाक!
खामगाव- आपला बुलढाणा जिल्हा बातमी:- मध्यरात्री ३ वाजताच्या दरम्यान खामगावच्या मुलांच्या जिल्हापरिषद शाळेला आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे शाळेतील साहित्य जळून खाक झाल्याची माहिती मिळत आहे.
खामगाव शहरातील नांदुरा रोडवरील जिल्हा परिषद मुलांच्या शाळेच्या इमारतीला २३ मे च्या रात्री ३ वाजताच्या सुमारास भीषण आग लागून शाळेचे सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. रात्री ३ वाजताच्या सुमारास आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर नागरिकांनी खामगाव अग्निशमक दलाला माहिती दिली. अग्निशमन दलाला माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठूनआगीवर नियंत्रण मिळविले. मात्र लागलेल्या या भीषण आगीत शाळेचे सर्व कागदपत्रे व साहित्य जळून मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. आग कशी व कशामुळे लागली हे सध्य कळू शकले नाही.विशेष म्हणजे यापूर्वी रेल्वे स्टेशनच्या पाठीमागे असलेल्या खामगाव पालिकेच्या शाळेतही रात्रीच्या दरम्यान अशीच आग लागल्याची घटना घडली होती.